-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे.
-
या खास प्रसंगी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस हिने आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दिविजाने सोशल मीडियावर आईसाठी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.
-
“असे म्हणतात की, घर ही केवळ एक वास्तू नसते; तर ती एक व्यक्ती असते आणि माझ्यासाठी ते घर नेहमीच माझी ‘मम्मा’ राहिली आहे,” असे दिविजाने म्हटले आहे.
-
“मी ओळखत असलेल्या सर्व स्त्रियांमध्ये सर्वांत खंबीर, श्रेष्ठ आणि खऱ्या असलेल्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझी पहिली गुरू आणि माझी आजवरची सर्वांत चांगली मैत्रीण आहेस. तू अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस आणि तरीही तू मी पाहिलेली सर्वांत गोड आणि दयाळू व्यक्ती आहेस. मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान वाटतो आणि मला आशा आहे की, येणाऱ्या प्रत्येक जन्मात आपली भेट अशीच होत राहो,” अशी भावना तिने व्यक्त केली.
-
या पोस्टसोबतच दिविजाने आईसोबतचे काही सुंदर आणि खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये फडणवीस कुटुंबातील आनंदाचे अनेक क्षण पाहायला मिळत आहेत.
-
सोशल मीडियावर दिविजाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून अमृता फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:दिविजा फडणवीस/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण