-
Happy Birthday Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांचा आज (९ एप्रिल) वाढदिवस.
-
आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.
-
अमृता फडणवीस यांचे माहेरचे नाव अमृता शरद रानडे असे आहे. त्यांचे वडील डॉ. शरद रानडे हे नामवंत नेत्ररोग तज्ज्ञ असून आई डॉ. चारुलता रानडे या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.
-
अमृता यांचे प्राथमिक शिक्षण नागपूरच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी नागपूरच्याच ‘जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स’मधून पदवी संपादन केली आणि पुण्याच्या नामांकित ‘सिम्बायोसिस’ संस्थेतून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
-
अमृता यांनी आपल्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये एका बँकेत कॅशियर म्हणून केली होती.
-
आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी ॲक्सिस बँकेत (Axis Bank) उच्च पदापर्यंत मजल मारली.
-
अमृता फडणवीस या एक उत्तम शास्त्रीय गायिका आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
-
तसेच ‘दिव्याज फाउंडेशन’च्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य आणि उपक्रम राबवत असतात.
-
देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांचा विवाह २००५ मध्ये झाला.
-
२०१४ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात तरुण ‘फर्स्ट लेडी’ होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांना दिविजा नावाची मुलगी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण