-
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) माजी पत्नी आणि सर्बियन अभिनेत्री नताशा स्टँकोविक (Natasa Stankovic) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
निमित्त आहे नताशाने आपला लाडका लेक ऑगस्त्य पंड्या (Agastya Pandya) याच्याबरोबर केलेले एक खास फोटोशूट.
-
नताशाने नुकतेच अगस्त्यसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, जे सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी दोघांनीही ‘ट्विनिंग’ केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
नताशा आणि अगस्त्यने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली असून, त्यांचा हा कूल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
हे फोटो शेअर करताना नताशाने अत्यंत भावूक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, “माझा छोटा मुलगा आता मोठा झाला आहे” (My Little Boy All Grown Up).
-
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टँकोविक जुलै २०२४ मध्ये अधिकृतपणे एकमेकांपासून वेगळे झाले.
-
लग्नाच्या ४ वर्षांनंतर या जोडीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
-
मात्र, वैयक्तिक आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरी, ते दोघेही आपल्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी चोख पार पाडत आहेत.
-
याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हार्दिकने नताशा आणि अगस्त्यला एक आलिशान गाडी भेट दिली होती, ज्याची मोठी चर्चा झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : नताशा स्टँकोविक/इन्स्टाग्राम)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण