-
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.
-
संसद भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
-
शपथविधी झाल्यानंतर उपराष्ट्रपतींनी पार्थ पवार यांचे अभिनंदन केले.
-
यावेळी त्यांनी पार्थ यांना मोलाचा सल्ला दिला: “तुमच्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवा,” अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच ‘गुलाबी जॅकेट’ परिधान करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
आज आपल्या राजकीय प्रवासातील या महत्त्वाच्या टप्प्यावर पार्थ पवार यांनीदेखील तशाच प्रकारचे गुलाबी जॅकेट परिधान केले होते.
-
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी जपलेली ही स्टाईल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
-
या ऐतिहासिक क्षणी पार्थ पवार यांना पाठबळ देण्यासाठी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
-
पार्थ पवार आता राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण