-
Siblings Day 2026: दरवर्षी १० एप्रिल हा दिवस जगभरात ‘सिबलिंग्स डे’ म्हणजेच ‘भावंडांचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
-
भाऊ-बहिणीच्या नात्यातील ओलावा, अतूट प्रेम आणि मैत्रीचा उत्सव साजरा करण्याचा हा खास दिवस.
-
याच निमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) कन्या सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) आपला भाऊ अर्जुन तेंडुलकरबरोबरचे (Arjun Tendulkar) काही जुने आणि खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
मुळात अमेरिकेतून सुरू झालेली ‘सिबलिंग्स डे’ची ही संकल्पना आता भारतातही लोकप्रिय होत आहे.
-
आपल्याकडे रक्षाबंधन आणि भाऊबीज यांसारखे पारंपरिक सण असले, तरी बदलत्या काळात हा दिवस भावंडांमधील मैत्रीपूर्ण नाते साजरे करण्याची एक वेगळी संधी देतो.
-
सारा आणि अर्जुन हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात.
-
विशेष म्हणजे, ते आपल्या फिटनेसबाबतही कमालीचे जागरूक असून त्यांचे वर्कआउट व्हिडिओ अनेकदा चर्चेत असतात.
-
अर्जुन तेंडुलकरच्या आयुष्यात नुकतीच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली होती.
-
५ मार्च २०२६ रोजी अर्जुनने सानिया चंडोकबरोबर मुंबईत एका शाही सोहळ्यात विवाहगाठ बांधली.
-
लग्नानंतरच्या या पहिल्याच सिबलिंग्स डे निमित्त साराने शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यापूर्वी ‘पुन्हा बदली’! कोणत्या मंत्र्यांचा मुंढेंना विरोध? नाशिक कुंभमेळ्याची बदलीस किनार?