-
भारतीय संगीत विश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी निधन झालं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
-
दिग्गज गायिका आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील गाण्यात आपल्या सुमधूर आवाजाची एक वेगळी छाप सोडली, त्यामुळे भारतीय संगीत विश्वात त्यांना स्वरसम्राज्ञी म्हणून ओळखले जाते.
-
‘सुरांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत ११,००० हून अधिक गाणी गायली आहेत, ज्यामुळे त्या जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायकांपैकी एक बनल्या आहेत.
-
आशा भोसले यांनी १९४० च्या दशकात गायला सुरुवात केली आणि अनेक दशके गायन करत मोठ्या संख्येने गाणी रचली.
-
हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलगू, इंग्रजी आणि इतर जवळपास २० विविध भाषांमध्ये गाणी गायली.
-
आशाजींनी रोमँटिक, गझल, पॉप, भजन आणि चित्रपट गीतांसहित जवळपास प्रत्येक संगीत प्रकाराला आपला आवाज दिला आहे.
-
त्यांनी हजारो चित्रपटगीते गायली आहेत आणि बॉलीवूडमधील जवळपास प्रत्येक प्रमुख अभिनेत्रीला आपला आवाज दिला आहे.
-
सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल आशा भोसले यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.
-
आशा भोसले यांचा संगीत प्रवास दीर्घ आणि गौरवशाली राहिला असून, त्यांनी हजारो गाणी गाऊन भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले आहे. (photo – लोकसत्ता संग्रहित / Instagram)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम