-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पत्नी तनिष्का कुलकर्णी यांनी नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये तनिष्का यांनी अतिशय सुंदर अशी जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे.
-
साडीतील फोटोंसोबतच त्यांनी बागेतील केशरी आणि जांभळ्या रंगाच्या मनमोहक फुलांचे फोटोही पोस्ट केले आहेत.
-
आपल्या या पोस्टला तनिष्का यांनी ‘बारामतीची सकाळ’ (Baramati mornings), अशी समर्पक कॅप्शन दिली आहे.
-
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झाला आहे.
-
तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईच्या असून, त्यांचे कुटुंब मोठ्या व्यावसायिक पार्श्वभूमीतून येते.
-
बारामतीमधील निसर्गरम्य सकाळचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
तनिष्का यांनी शेअर केलेली ही प्रसन्न छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत असून, त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- तनिष्का पवार इन्स्टाग्राम)
सारा तेंडुलकरने शेअर केले अर्जुनबरोबरचे खास फोटो; ‘सिबलिंग्स डे’निमित्त व्यक्त केले प्रेम