-
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३५ वी जयंती देशभरासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
-
या खास दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गौतमीने तिचे काही नवीन फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौतमी गुलाबी रंगाच्या सिल्क साडीत अतिशय सुंदर दिसत आहे.
-
गौतमीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांचा मोठा जनसागर लोटला आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
SRH vs RR: “हा पुरस्कार मी…”, स्वप्नवत पदार्पण करणाऱ्या प्रफुल हिंगेने सामनावीर अवॉर्ड कोणाला समर्पित केला? सामन्यानंतर म्हणाला…