-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे (Sharad Pawar) युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) सध्या आपल्या पत्नी तनिष्का पवार (Tanishka Pawar) यांच्यासह कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
-
या दौऱ्यादरम्यान युगेंद्र पवार व तनिष्का पवार यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.
-
त्यांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरात युगेंद्र आणि तनिष्का पवार यांनी मनोभावे पूजा-अर्चा केली.
-
यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांशी त्यांनी अत्यंत आपुलकीने संवादही साधला.
-
या भेटीबद्दल बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, “श्री महालक्ष्मी देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम असलेल्या या पावन भूमीत दर्शन घेतल्याने पुढील वाटचालीसाठी मोठी ऊर्जा आणि बळ मिळते.”
-
कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने युगेंद्र पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. “संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा विचार मांडला. समाजातील वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला,” अशा शब्दांत पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : युगेंद्र पवार/इन्स्टाग्राम)
Photos: बारामतीच्या बागेत युगेंद्र पवार यांच्या पत्नीचं फोटोशूट; जांभळ्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष