-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी पत्नी तनिष्का पवार (Tanishka Pawar) यांच्यासह श्री क्षेत्र आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामांचे दर्शन घेतले.
-
दर्शनानंतर या पवार दांपत्याच्या फोटोंची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
युगेंद्र पवार यांनी यावेळी बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली.
-
त्यानंतर त्यांनी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंदिराच्या कार्याची माहिती घेतली.
-
“बाळूमामांचे कार्य हे साधेपणा आणि जनसेवेचे प्रतीक आहे.”
-
“आदमापूरसारख्या पवित्र ठिकाणी दर्शनाचा अनुभव आत्मिक समाधान देणारा असतो,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
-
काही दिवसांपूर्वीच या दांपत्याने करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते, त्यानंतर आता त्यांनी बाळूमामांच्या चरणी हजेरी लावली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : युगेंद्र पवार/इन्स्टाग्राम)
दोनदा फेरमतमोणी, वीज गायब, भाजपचे चंद्रशेखर कदम २३ मतांनी विजयी… राहुरीतील २८ वर्षांपूर्वीच्या पोटनिवडणुकीतील थरार