-
मुंबई पोलीस दलातील प्रसिद्ध ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ आणि माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दया नायक यांच्या मुलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
-
३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त झालेले नायक हे मुंबई पोलीस दलातील चकमकफेम अधिकाऱ्यांच्या पिढीतील शेवटचे सक्रिय अधिकारी होते. त्यांच्या मुलाच्या या विशेष सोहळ्याला राजकीय आणि मनोरंजन विश्वातील अनेक बड्या चेहऱ्यांनी हजेरी लावली होती.
-
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दया नायक यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
दिग्गज मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी दया नायक यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवली.
-
बॉलिवूडचा ‘बजरंगी भाईजान’ अभिनेता सलमान खान याने दया नायक यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
अभिनेता टायगर श्रॉफने दया नायक यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावत सोहळ्याची शोभा वाढवली.
-
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याने दया नायक यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधु-वरांना आशीर्वाद दिले.
-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी यांनी या दिमाखदार सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी दया नायक यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.
-
बॉलिवूड अभिनेते रजत बेदी यांनी दया नायक यांच्या पुत्राच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरुण धवन यानेही या लग्नसोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
-
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल दया नायक यांच्या मुलाच्या लग्नामध्ये उत्साहाने सहभागी झाला होता.
“धुरंधर २ मधील दाऊदचं चित्रण चुकीचं,” दाऊद इब्राहिममुळे घर चालतंय म्हणणाऱ्या दिग्दर्शकाचे विधान; म्हणाले, “त्याची प्रकृती…”