-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या घरी सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे.
-
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
रेवती सुळे यांचा विवाह नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी निश्चित झाला आहे.
-
या शुभ कार्यानिमित्त सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह देवदर्शनाला सुरुवात केली असून, लग्नाची पहिली पत्रिका देवाला अर्पण केली आहे.
-
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.
-
यावेळी त्यांनी लाडक्या बाप्पाच्या चरणी कन्या रेवती आणि सारंग यांच्या लग्नाची पत्रिका ठेवून, त्याचे आशीर्वाद घेतले.
-
सिद्धिविनायक मंदिरानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
-
महालक्ष्मी देवीच्या चरणीदेखील लग्नाची पत्रिका अर्पण करून, त्यांनी भावी दाम्पत्याच्या सुखद आयुष्यासाठी प्रार्थना केली.
-
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुळे कुटुंबीयांनी भक्तिभावाने या मंगल कार्याची पहिली पत्रिका बाप्पा आणि देवीच्या चरणी अर्पण केली आहे. (सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!