-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रविवारी १९ एप्रिल रोजी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले.
-
मुकेश अंबानी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सहपरिवार मंदिरात हजेरी लावून श्री गणेशाचे आशीर्वाद घेतले.
-
या प्रसंगी त्यांच्यासोबत पत्नी नीता अंबानी, मुलगा अनंत अंबानी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
-
अंबानी कुटुंबीयांनी गणपती बाप्पाची विधीवत पूजा आणि आरती करून दर्शन पूर्ण केले.
-
मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात मुकेश अंबानी यांनी हात जोडून मनोभावे बाप्पाची प्रार्थना केली.
-
यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने मुकेश अंबानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
-
मुकेश अंबानी यांनी अत्यंत साध्या आणि पारंपरिक वेशात दर्शन घेत वाढदिवसाचा संकल्प बाप्पा चरणी अर्पण केला.
-
(सर्व फोटो साभार- siddhivinayaktempletrust इन्स्टाग्राम)
१ नंबर! विद्यार्थ्यांसह शिक्षिकेने धरला ठेका, ‘मुकाबला’वर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO