-
मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत.
-
१८ एप्रिल रोजी रितू तावडे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात पार पडला असून, या सेलिब्रेशनचे फोटो आता समोर आले आहेत.
-
कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाला ‘स्नेहमेळावा’ असे नाव देण्यात आले होते.
-
वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेमाने भारावून जात रितू तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला हा स्नेहमेळावा खरोखरच अविस्मरणीय होता. ज्येष्ठ मान्यवर, सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांमुळे मला जनसेवेसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. हे स्नेहाचे नाते असेच कायम राहो.”
-
रितू तावडे यांचा जन्म १८ एप्रिल १९७३ रोजी झाला असून, त्यांनी वाणिज्य शाखेतून द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
-
गेल्या अनेक वर्षांपासून त्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सक्रिय आहेत.
-
त्या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून आल्या आहेत.
-
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
-
स्थापत्य समिती या समितीच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
-
महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या संयोजिका म्हणून त्यांची ओळख आहे.
-
महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (MAVIM) संचालिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
-
राजकारणाबरोबरच त्या ‘मे. आर. आर. इंटरप्राईजेस’ या कंपनीच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रातही कार्यरत आहेत.
-
जनसेवेचा वारसा आणि कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ यामुळे मुंबईच्या राजकारणात त्यांचे स्थान आजही महत्त्वपूर्ण मानले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रितू तावडे/इन्स्टाग्राम)
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!