-
Shri Kedarnath Dham Officially Open Today: आज (२२ एप्रिल) पहाटे धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या गजरात पवित्र केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.
-
गेल्या काही तासांपासून होत असलेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे संपूर्ण मंदिर परिसर पांढऱ्या शुभ्र चादरीने वेढला गेला आहे.
-
या कडाक्याच्या थंडीतही भाविकांच्या उत्साहात तसूभरही कमतरता जाणवली नाही.
-
या सोहळ्यासाठी केदारनाथ मंदिराला विविध प्रकारच्या फुलांनी अतिशय मनमोहक रितीने सजवण्यात आले होते.
-
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या ऐतिहासिक क्षणी प्रत्यक्ष उपस्थित राहून दर्शन घेतले आणि विधिवत पूजा अर्चा केली.
-
यावेळी प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे संपूर्ण मंदिर परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे वातावरणात अधिकच चैतन्य निर्माण झाले.
-
मुख्यमंत्री धामी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “हा एक अलौकिक आणि आनंददायी अनुभव आहे. मंदिर समिती आणि प्रशासनाने भाविकांच्या सुखकर दर्शनासाठी चोख व्यवस्था केली आहे, जेणेकरून रांगेतील शेवटच्या सामान्य माणसालाही बाबांचे दर्शन सुलभतेने घेता येईल.”
-
चारधाम यात्रेला अधिकृत सुरुवात झाल्याने देशभरातून हजारो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत.
-
प्रतिकूल हवामान आणि बर्फवृष्टीचा अंदाज घेऊन प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून भाविकांच्या आरोग्य आणि निवासाची विशेष खबरदारी घेतली आहे.
Photos : सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची पहिली पत्रिका देवाचरणी; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत बाप्पा आणि देवीला आमंत्रण!