-
रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी या नेहमीच त्यांच्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण साड्यांमुळे चर्चेत असतात.
-
नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी परिधान केलेली ‘जामदानी’ साडी पुन्हा एकदा कौतुकाचा विषय ठरली आहे.
-
ही साडी पश्चिम बंगालमधील फुलीया गावच्या विणकरांच्या अत्यंत जुन्या आणि दुर्मीळ विणकाम कलाकौशल्याचे उत्तम उदाहरण आहे.
-
साडीचे विणकाम पूर्ण करण्यासाठी पद्मश्री विजेते बिरेन कुमार बसाक आणि त्यांच्या टीमला तब्बल दोन वर्षे लागली.
-
यात मीनाकारी जामदानी तंत्राचा वापर केला असून, सुताच्या धाग्यांनी साडीवर अत्यंत सूक्ष्म चित्रे साकारण्यात आली आहेत.
-
साडीच्या पदरावर ग्रामीण जीवन, सण आणि निसर्गाचे चित्रण करणारी विणलेली नक्षी एखाद्या जिवंत कथेसारखी दिसते.
-
कापडावर विणलेल्या माशांच्या प्रतिमा हे या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे बंगालमध्ये समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
-
भारताच्या कानाकोपऱ्यातील विणकाम कला जागतिक स्तरावर नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची झलक या साडीतून दिसते.
-
(सर्व फोटो साभार- swadesh_online इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राच्या संपन्नतेचा व्हिडीओ पोस्ट करत इराणची ट्रम्प यांच्यावर टीका; ‘भारत नरकासमान’, या विधानावरून सुनावले