-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
-
यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची कन्या रेवती सुळेदेखील (Revati Sule) उपस्थित होत्या.
-
रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याने सध्या पवार कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
मतदानानंतर सुप्रिया सुळे आणि रेवती यांनी बारामतीची ग्रामदेवता माळावरच्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
-
त्यानंतर त्यांनी दिवसभरात बारामती आणि काटेवाडी परिसरात विविध कौटुंबिक भेटीगाठी घेतल्या.
-
सुप्रिया सुळे यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून काकी आणि अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली.
-
त्यानंतर त्यांनी बंधू राजेंद्र पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली, जिथे सुनंदा पवार, आमदार रोहित पवार आणि कुंती पवार उपस्थित होते.
-
विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
-
काटेवाडी येथे अरविंद पवार आणि मंगल पवार यांच्या निवासस्थानी नीताताई आणि रेवतीसह भेट दिली. यावेळी श्रीजीत, सोनाली, अधिराज आणि आर्वी यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
-
याशिवाय शिवाजी पवार, अरुण पवार आणि अक्षय चंद्रकांत पवार यांच्याही निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळेंनी विचारपूस केली.
-
“आज सर्वांना भेटून अतिशय आनंद झाला,” अशी भावना सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. या भेटींचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
Kalyan Dombivli Rickshaw: युपी, बिहारमधून काल आले आणि आज कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालवायला लागले; परप्रांतीयांना शासकीय दाखले मिळणे सोपे