-
प्रसिद्ध युट्यूबर, गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंदी सरदेसाईने (Swanandi Sardesai) अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2026) शुभ मुहूर्तावर (१९ एप्रिल २०२६) आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
-
कोणत्याही थाटामाटाविना, अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने स्वानंदीने विक्रांत रामदास (Vikrant Ramdas) यांच्याशी विवाहगाठ बांधली.
-
विक्रांत रामदास हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक परिचित नाव असून तो लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून कार्यरत आहेत.
-
स्वानंदीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.
-
हा विवाहसोहळा स्वानंदीच्या कोकणातील घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
-
यावेळी स्वानंदीने परिधान केलेली हिरवी नऊवारी साडी आणि मोत्यांच्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
तर विक्रांतने पांढरा कुर्ता आणि धोतर असा साजेसा मराठमोळा पेहराव केला होता.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर होताच, मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींसह हजारो चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी सरदेसाई/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक