-
आंतरराष्ट्रीय गायिका आणि प्रसिद्ध उद्योजिका रिहाना पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाली आहे.
-
तिच्या कॉस्मेटिक्स ब्रँडच्या लाँचसाठी ती भारत दौऱ्यावर आली आहे.
-
या दौऱ्यादरम्यान रिहानाने मुंबईतील अंबानींचे निवासस्थान असलेल्या ‘अँटिलिया’ला भेट दिली.
-
ईशा अंबानी, श्लोका मेहता, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी तिचे जंगी स्वागत केले.
-
रिहानाच्या स्वागतासाठी अँटिलियामध्ये खास पारंपरिक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
तिने हातामध्ये पूजेचे ताट घेऊन आरती केली, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
पूजेनंतर रिहानाने अंबानी कुटुंबासोबत फुलांची होळी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
-
२०२४ मध्ये अनंत अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी रिहाना भारतात आली होती आणि आता पुन्हा तिच्या भेटीने चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
-
(सर्व फोटो साभार- Nita Mukesh Ambani Cultural Centre इन्स्टाग्राम)
Marathi Compulsory Pratap Sarnaik Love Story: “ज्या मुलीला मदत केली तीच प्रेमात पडली”, गुजराती पत्नी, मराठी भाषा आणि राजकारणावर काय बोलले मंत्री प्रताप सरनाईक?