-
१ मे हा दिवस संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
१९६० साली याच दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली होती.
-
हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी नसून मराठी अस्मिता, संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे.
-
या मंगलमयी दिनाचे औचित्य साधून घरासमोर किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध रांगोळ्या काढल्या जातात.
-
अमरावतीची प्रसिद्ध रांगोळी कलाकार साक्षी इंगळेने (Sakshi Ingle) सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनानिमित्त काही खास रांगोळी डिझाइन्स शेअर केल्या आहेत. तिच्या या कलाकृतींना नेटीझन्सची मोठी पसंती मिळत आहे.
-
महाराष्ट्र दिनाच्या रांगोळीसाठी केशरी, पांढरा आणि हिरवा या तिरंगी रंगांसोबतच ‘गेरू’ रंगाचा वापर केल्यास रांगोळीला एक पारंपारिक आणि उठावदार लूक येतो.
-
योगायोगाने १ मे हा ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे रांगोळीतून श्रमिकांचा सन्मान करणारा संदेशही देता येईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी इंगळे/इन्स्टाग्राम आणि Pexels)
“आंदोलनात जाण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला”, NEET परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पानशुल बन्सलने CJP आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली?