-
भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) कन्या सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) पुन्हा एकदा आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे.
-
२३ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत पार पडलेल्या ‘GQ Most Influential Young Indians 2026’ या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात साराने आपल्या सौंदर्याने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
-
या विशेष सोहळ्यासाठी साराने अत्यंत स्टायलिश असा काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
-
या लूकला साजेसा असा ‘मिनिमल ग्लॅम’ मेकअप आणि मोकळे केस साराच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत होते.
-
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे सारा आणि तिची वहिनी सानिया यांचे बॉन्डिंग.
-
साराने तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) पत्नी सानियाबरोबर (Saaniya Chandhok) कॅमेऱ्यासमोर खास पोज दिल्या.
-
५ मार्च २०२६ रोजी अर्जुन आणि सानिया यांचा विवाहसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता.
-
लग्नानंतर या दोघी नणंद-भावजयींमधील मैत्रीपूर्ण केमिस्ट्री पहिल्यांदाच एका मोठ्या सार्वजनिक व्यासपीठावर पाहायला मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
“काय Energy आहे…” पिवळी साडी नेसून शिक्षिकेचा जोरदार डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फिदा