-
‘क्रिकेटचा देव’ मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला ५३ वा वाढदिवस अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक भावनेतून साजरा केला आहे.
-
कोणत्याही झगमगाटाऐवजी सचिनने यावर्षी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील मुलांबरोबर वेळ घालवून त्यांचा आनंद द्विगुणित केला.
-
सचिनची कन्या सारा तेंडुलकरने सोशल मीडियावर या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आपल्या वडिलांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.
-
यावर्षी सचिनने केवळ मुलांबरोबर खेळ खेळला नाही, तर त्यांना हक्काची खेळाची मैदाने देखील भेट दिली आहेत.
-
साराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “बाबांचे वाढदिवस नेहमीच स्वतःसाठी काही मिळवण्यापेक्षा, समाजाला काहीतरी देण्यावर आधारित असतात.”
-
यावर्षीचा वाढदिवस ‘मैदान कप’ (Maidan Cup) या विशेष उपक्रमाला समर्पित होता.
-
‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’ आणि ‘माणदेशी चॅम्पियन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील शाळांमध्ये ५० हून अधिक खेळाची मैदाने विकसित करण्यात आली आहेत.
-
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, ही मैदाने केवळ बांधली गेली नाहीत, तर स्थानिक ग्रामीण समुदाय, मुले आणि पालकांनी श्रदानातून ती साकारली आहेत.
-
ही मैदाने आता ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी स्वप्न पाहण्याचे आणि प्रगती करण्याचे हक्काचे केंद्र बनली आहेत.
-
आपल्या पोस्टच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करताना सारा म्हणाली, “दंतेवाडा येथील मुलांचा उत्साह, त्यांचे निरागस हास्य आणि अफाट ऊर्जा यांच्या सानिध्यात हा दिवस साजरा करता आला, हे माझे भाग्य आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
नागपूर-गोवा एक्सप्रेस आता कायमस्वरूपी! २४ डब्यांची एक्सप्रेस आणि प्रमुख शहरांचे थांबे; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक