-
Digital Census 2026 Self Enumeration Begins in Maharashtra: केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेतंर्गत माहिती संकलनाची अचूकता आणि वेग वाढवण्यासाठी यंदाची जनगणना व्यापक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असेल.
-
भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) ही संकल्पना राबवण्यात येत असून, महाराष्ट्रात या प्रक्रियेला आज, १ मे २०२६ पासून सुरुवात झाली आहे.
-
२०२७ च्या आगामी जनगणनेसाठी महाराष्ट्रात ‘घर-यादी’ आणि ‘गृहगणना’ सुरू होण्यापूर्वी नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
-
१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक ऑनलाईन पद्धतीने आपला कौटुंबिक तपशील नोंदवू शकतात.
-
नागरिकांनी https://se.census.gov.in या पोर्टलवर भेट देऊन माहिती भरायची आहे.
-
कुटुंबातील कोणताही एक सदस्य साधारण १५ ते २० मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
-
स्व-गणना करताना कोणतेही दस्तऐवज (Documents) अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
-
अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाईल किंवा ई-मेलवर एक ‘स्व-गणना ओळखपत्र’ (SE ID) प्राप्त होईल.
-
महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी स्पष्ट केले की, “स्व-गणना करणे ऐच्छिक आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांच्या घरी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक (Enumerators) प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील.”
-
ज्या नागरिकांनी स्व-गणना केली आहे, त्यांनी प्रगणक घरी आल्यावर त्यांना आपला ‘SE ID’ देणे आवश्यक आहे. प्रगणकाकडून या डेटाची पडताळणी झाल्यानंतरच तुमची गणना पूर्ण मानली जाईल.
-
डिजिटल प्रक्रियेत डेटा सुरक्षिततेसाठी सर्व माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात सरकारी सर्व्हरवर साठवली जाईल. सायबर फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
केवळ https://se.census.gov.in याच अधिकृत वेबसाईटचा वापर करा.
-
जनगणनेशी संबंधित अधिकृत SMS प्रेषकाच्या नावात ‘RGICEN’ हा कीवर्ड (उदा. AD-RGICEN-S) असणे अनिवार्य आहे.
-
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि आपल्या ओटीपीची (OTP) खातरजमा करा.
Video: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळेंनाही फटका; ट्रॅफिक जामचा शेअर केला व्हिडीओ!