-
Mumbai Pune Missing Link Maharashtra Day: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाचे लोकार्पण आज, १ मे २०२६ रोजी दिमाखात पार पडले. (फोटो : दीपक जोशी/लोकसत्ता)
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. (फोटो : दीपक जोशी/लोकसत्ता)
-
१३.३ कि.मी. लांबीच्या या प्रकल्पात १०.५ कि.मी. लांबीचे दोन बोगदे आहेत. यातील एक बोगदा तब्बल २३.७५ मीटर रुंद असून, तो जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक ठरला आहे.
-
टायगर व्हॅलीवर १८२ मीटर उंचीचा भव्य ‘केबल-स्टेड’ पूल उभारण्यात आला आहे. हा भारतातील अशा प्रकारचा सर्वाधिक उंचीचा पूल आहे.
-
हा मार्ग लोणावळा तलावाच्या सुमारे १८२ मीटर खालून जातो, जे जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. (फोटो : दीपक जोशी/लोकसत्ता)
-
मुंबई ते पुणे प्रवासातील वेळ आता २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. (फोटो : दीपक जोशी/लोकसत्ता)
-
लोणावळा-खंडाळा या अवघड आणि वळणदार घाटातून प्रवास करण्याची आता गरज उरणार नाही.
-
पर्यायाने पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या भीतीपासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-
मार्गाचे एकूण अंतर ६ किलोमीटरने कमी झाल्यामुळे वाहनांच्या इंधनाची मोठी बचत होणार आहे. (फोटो : दीपक जोशी/लोकसत्ता)
-
खालापूर टोल नाका ते कुसगाव दरम्यान होणारी वाहतूक कोंडी आता इतिहासजमा होणार आहे.
-
सुरक्षिततेसाठी या मार्गावर चारचाकी वाहनांसाठी १०० किमी/तास आणि बस/प्रवासी वाहनांसाठी ८० किमी/तास वेगमर्यादा निश्चित केली आहे.
-
दिलासादायक बाब म्हणजे, या नवीन मार्गासाठी प्रवाशांकडून कोणताही अतिरिक्त टोल घेतला जाणार नाही.
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’