-
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांचा सुपुत्र आशुतोष आणि हर्षदा यांचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.
-
ठाण्यातील एका आलिशान रिसॉर्टवर संपन्न झालेल्या या शाही सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
-
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी नवदाम्पत्याला भेटून शुभाशीर्वाद दिले.
-
या विवाह सोहळ्याला भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार आवर्जून उपस्थित होते.
-
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही या सोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
तसेच, शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित राहून आशुतोष व हर्षदा यांच्या पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले.
-
मुलाच्या लग्नाबद्दल भावना व्यक्त करताना नरेश म्हस्के म्हणाले, “आयुष्यातील महत्त्वाच्या १६ संस्कारांपैकी एक असलेला विवाह संस्कार काल विधिवत पार पडला, याचे मनस्वी समाधान आहे.”
-
“आमचे पहिले अपत्य असलेला सुस्वभावी आशुतोष आता नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आणि आनंद आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : नरेश म्हस्के/इन्स्टाग्राम)
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’