-
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे ‘नमन तुला’ (Naman Tula Song) हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.
-
विशेष म्हणजे, या गाण्यात त्यांनी केवळ गायनच केले नसून, नऊवारी साडी परिधान करून पारंपरिक शैलीत नृत्यही केले आहे.
-
या गाण्यात अमृता फडणवीस यांचा निळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील मराठमोळा लूक लक्ष वेधून घेत आहे.
-
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याचा गौरव या गाण्यातून करण्यात आला आहे.
-
ऐतिहासिक वसई किल्ल्यावर या गाण्याचे चित्रीकरण पार पडले, जे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते.
-
प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून, चैतन्य कुलकर्णी यांनी याचे शब्द लिहिले आहेत.
-
या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा शक्ती हसिजा यांनी सांभाळली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
“यातील प्रसंग…”, IPS विश्वास नांगरे पाटलांची ‘राजा शिवाजी’बद्दल लक्षवेधी पोस्ट; रितेश देशमुखबद्दल म्हणाले…