-
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा शाही विवाहसोहळा नुकताच अत्यंत थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
-
इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि प्रसिद्ध उद्योजक सुनील चिलप यांचे सुपुत्र साहिल यांचा हा विवाहसोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
-
संगमनेर जवळील गुंजाळवाडी शिवारात रविवारी रात्री पार पडलेल्या या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
-
यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले.
-
हा विवाहसोहळा संगमनेरच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि विक्रमी गर्दीचा सोहळा ठरला.
-
दुपारपासूनच संगमनेरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
-
भव्य व्यासपीठासमोर भाविक आणि पाहुण्यांची अलोट गर्दी उसळली होती.
-
विशेषतः राज्यभरातून आलेल्या वारकरी संप्रदायातील अनुयायांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
-
केवळ लग्न मंडपच नव्हे, तर भोजन कक्षातही जनसागराचा महापूर लोटला होता.
-
गेल्या अनेक दिवसांपासून या शाही लग्नाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होती, आणि अपेक्षेप्रमाणे या सोहळ्याने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले.
-
(सर्व फोटो सौजन्य : इंदुरीकर महाराज/इन्स्टाग्राम)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : पश्चिम बंगालमध्ये ‘खेला’? भाजपाची आघाडी; ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात काय स्थिती?