-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत राज्याच्या राजकारणात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
-
सुनेत्रा पवार यांनी तब्बल २,१४,०९३ मताधिक्याने विजय मिळवला.
-
या विजयासह त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २०१९ मधील मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढला आहे.
-
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील आकस्मिक निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती.
-
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करण्यात आले, मात्र २२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली.
-
२४ व्या फेरीअखेर जाहीर झालेल्या निकालात सुनेत्रा पवार यांना २,१८,९३० मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील सर्व २२ उमेदवार आणि ‘नोटा’ मिळून केवळ ४,८३७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले.
-
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा १,६५,२६५ मतांच्या फरकाने पराभव केला होता.
-
सुनेत्रा पवार यांनी आता २,१४,०९३ मतांचे मताधिक्य घेत हा जुना विक्रम मागे टाकला आहे.
-
विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली.
-
“हा विजय आणि जनतेने दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
-
तसेच, अजितदादांच्या निधनाचे दुःख ताजे असल्याने कार्यकर्त्यांनी कोणताही जल्लोष करू नये, मिरवणुका टाळाव्यात आणि गुलाल उधळू नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : LIVE : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींची ७ हजारांनी आघाडी! निकालाचा सस्पेन्स वाढला; शेवटच्या ८ फेऱ्या ठरणार ‘गेमचेंजर’