-
जागतिक फॅशन विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026) सोहळ्यात यंदा भारतीय संस्कृती आणि फॅशनचा मोठा प्रभाव पाहायला मिळाला.
-
फॅशनच्या या सोहळ्यात अनेक भारतीय सेलिब्रिटींनी आपल्या अनोख्या आणि लक्षवेधी स्टाईलने सर्वांना थक्क केले.
-
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने यंदा मेट गालाच्या रेड कार्पेटवर दिमाखात पदार्पण केले.
-
करणने प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने तयार केलेला खास पोशाख परिधान केला होता.
-
विशेष म्हणजे, हा लूक जगप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमधील कलेवर आधारित होता.
-
प्रसिद्ध उद्योजिका ईशा अंबानीने प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी साकारलेली सुवर्ण तंतूंनी (Gold-Threaded) विणलेली खास साडी नेसली होती.
-
या साडीच्या माध्यमातून ईशाने भारतीय कारागिरी जागतिक स्तरावर अभिमानाने सादर केली.
-
गायिका आणि उद्योजिका अनन्या बिर्लाने काळ्या रंगाचा ‘कौचर’ आउटफिट आणि प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी डिझाइन केलेला धातूचा मास्क परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
-
अनन्या बिर्लाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
-
प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा स्वतः देखील रेड कार्पेटवर भारतीय पेहरावात झळकला. त्याने मुंबईच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा पारंपारिक बंदगळा आणि जरदोजी भरतकाम असलेली ‘केप’ परिधान केली होती.
-
याशिवाय सुधा रेड्डी, नताशा पूनावाला, जयपूरच्या राजघराण्यातील राजकुमारी गौरवी कुमारी आणि पद्मनाभ सिंग यांनीही आपल्या पारंपारिक आणि आधुनिक फॅशनच्या संगमाने भारताची वेगळी छाप पाडली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सेलिब्रिटी/इन्स्टाग्राम)
ममता बॅनर्जींचा दारूण पराभव; भाजपाचे सुवेंदू अधिकारी १५ हजार मतांनी विजयी, भवानीपूरमध्ये भाजपाने कसे यश मिळवले?