-
ईशा अंबानीने नुकत्याच एका खास कार्यक्रमात आपल्या फॅशन स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या ड्रेसची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे हा ड्रेस एकूण २६ वेगवेगळ्या डिझाइनच्या बॉर्डर्सपासून तयार करण्यात आला आहे.
-
या २६ वेगवेगळ्या बॉर्डर्स भारताच्या विविध प्रदेशांमधील समृद्ध कला आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.
-
कारागिरांनी तब्बल ४५० तासांच्या अथक परिश्रमानंतर हा सुंदर ड्रेस साकारला आहे.
-
यात उत्तर प्रदेशचे जरी काम, पारसी गारा एम्ब्रॉयडरी, माहेश्वरी विणकाम आणि कच्चोबी यांसारख्या कलांचा समावेश आहे.
-
तसेच आरी भरत, तिल्ला, कांथा, कांजीवरम सिल्क, पैठणी आणि बनारसी ब्रोकेडचा वापर करून हा ‘लिव्हिंग टेपेस्ट्री’ ड्रेस बनवला आहे.
-
भारताच्या कानाकोपऱ्यातील विणकाम आणि आधुनिक फॅशन यांचा हा एक अप्रतिम संगम या ड्रेसमध्ये पाहायला मिळतो.
-
ईशा अंबानीने परिधान केलेल्या या ड्रेसमधील प्रत्येक बॉर्डर स्वतःचा एक वेगळा इतिहास आणि संस्कृती सांगत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मनिष मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
‘हे’ पहिलं लक्षण सांगतं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो; ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, स्टेज १ मध्ये जाण्याआधी वेळीच व्हा सावध