-
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच नागपूरचे उद्योजक अरुण लखाणी यांचे चिरंजीव सारंग लखाणी यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी मुंबईतील सिद्धिविनायक व महालक्ष्मी मंदिरात पहिली पत्रिका अर्पण करून विवाहाचा शुभारंभ केला.
-
सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट घेतली.
-
सुप्रिया सुळेंनी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली.
-
कौटुंबिक स्नेह जपत सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे यांनी श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांची भेट घेतली.
-
आगामी लग्नसराईच्या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली.
-
भावी वधू-वर रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांनी स्वतः आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
-
सुप्रिया सुळे यांनी पुण्यात जाऊन संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेतली.
-
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना निमंत्रण देऊन त्यांनी या सोहळ्याचे नियोजन आखले आहे.
-
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती या लग्नाला लाभणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे