-
कोल्हापूरचे भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
आज ६ मे, बुधवार रोजी खासदार महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज आणि सून मंजिरी (अंजली) यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
-
महाडिक कुटुंबातील ही गोड बातमी त्यांची मोठी सून वैष्णवी महाडिक यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर करत चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
-
विशेष म्हणजे, कालच ५ मे रोजी विश्वराज आणि मंजिरी यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता, ज्यामुळे या आनंदाला आता द्विगुणित स्वरूप प्राप्त झाले आहे.
-
मंजिरी महाडिक यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.
-
लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याने महाडिक कुटुंबावर सध्या अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करत नवीन पाहुणीचे स्वागत केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मंजिरी महाडिक आणि वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे