-
फॅशन जगतातील सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026) ची सध्या जगभरात चर्चा आहे.
-
यातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकर (Nalinee Mumbaikar) यांनी आपल्या खास ‘कोळी’ लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नलिनी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
नलिनी यांनी शेअर केलेले हे फोटो प्रत्यक्षातले नसून, ते AI (Artificial Intelligence) च्या मदतीने साकारलेले आहेत.
-
“आमचा कोळी संस्कृतीचा जलवा! ChatGPT आणि Gemini ने कल्पिलेलं हे आमचं समुद्राशी जोडलेलं फॅशन वर्ल्ड आहे,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिले आहे.
-
आपली कोकणी ओळख, परंपरा आणि आधुनिक फॅशन यांचा हा एक भन्नाट संगम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
-
व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये नलिनी यांनी गडद निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून त्यावर पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नलिनी मुंबईकर/इन्स्टाग्राम)
Government Formation News 2026 Live Updates: विजयच्या शपथविधीचं काय झालं? घराबाहेरचे मेटल डिटेक्टर काढले, समर्थक आपापल्या घरी परतले!