-
जगातील सर्वात मोठा फॅशन सोहळा असलेल्या मेट गाला २०२६ मध्ये ईशा अंबानीने आपल्या शाही लूकने भारतीय संस्कृतीचा आणि कलेचा प्रभाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा सिद्ध केला.
-
ईशाच्या लूकची सर्वात जास्त चर्चा तिच्या हातातील आंब्यामुळे झाली, जो प्रत्यक्षात प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी स्टीलपासून बनवलेले २० वर्षे जुने एक दुर्मीळ शिल्प आहे.
-
या बॅगची किंमत जवळपास ९५ लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. ही कलाकृती दिसायला अगदी खऱ्या पिकलेल्या आंब्यासारखी असून, तिने फॅशनच्या या मोठ्या व्यासपीठावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
भारतीय परंपरेत आंबा हा समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो, तर कलाकार सुबोध गुप्ता यांनी या शिल्पाला ‘सामान्य माणसाच्या’ जीवनाचे प्रतीक म्हणून सादर केले आहे.
-
या खास प्रसंगासाठी ईशाने डिझाइनर गौरव गुप्ता यांनी तयार केलेली शुद्ध सोन्याच्या धाग्यांची साडी नेसली होती, ज्यावर हाताने पेंट केलेली अत्यंत मोहक पिछवाई कला पाहायला मिळाली.
-
ही साडी तयार करण्यासाठी ५० हून अधिक कारागिरांनी १२ तासांहून अधिक काळ मेहनत घेतली असून, साडीसोबतचा स्कल्प्टेड केप तिला एक वेगळाच राजेशाही थाट देत होता.
-
ईशाच्या ब्लाऊजवर नीता अंबानी यांच्या संग्रहातील १८०० कॅरेटचे मौल्यवान हिरे, पाचू आणि कुंदन जडलेले होते, ज्यामध्ये हैदराबादच्या निजामाच्या खजिन्यातील एका दुर्मीळ सरपेचाचा समावेश होता.
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…