-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
सध्या सोशल मीडियावर रेवतीच्या लग्नाच्या पत्रिकेची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
रेवती यांचे होणारे पती सारंग लखानी हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत.
-
सारंग हे एक यशस्वी उद्योजक असून ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक म्हणून धुरा सांभाळत आहेत, तसेच ते क्रीडाप्रेमी आणि उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत.
-
हा शाही विवाहसोहळा २० जून २०२६ रोजी मुंबईत संपन्न होणार असल्याचे समजते.
-
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुळे दाम्पत्याने सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिरात पहिली पत्रिका अर्पण करून विवाहाच्या कार्याचा श्रीगणेशा केला.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही पत्रिका अत्यंत देखणी असून, सोनेरी रंगाच्या या पत्रिकेसोबत मिठाई, सुगंधी फुलांचा गजरा आणि एक सुबक भेटवस्तू (गिफ्ट) देण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये आज शपथविधी