-
इतिहासातील सौंदर्याची ही जीवघेणी मानके सिद्ध करतात की, शतकानुशतके लोकांनी केवळ आकर्षक दिसण्यासाठी काही विषारी रसायने आणि वेदनादायक पद्धतींचा वापर करून स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे.
-
आर्सेनिक ब्यूटी ट्रीटमेंट
१८व्या शतकात त्वचेचा रंग उजळण्यासाठी लोक चक्क आर्सेनिकयुक्त गोळ्यांचे सेवन करत, ज्यामुळे अवयव निकामी होऊन कर्करोग होत असे. -
फूट बाइंडिंग
लहान मुलींचे पाय कायमचे लहान ठेवण्यासाठी त्यांची हाडे मोडून पाय घट्ट बांधले जात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर वेदना सहन कराव्या लागत. -
शिशाची पावडर (Lead Powder)
चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी शिशाचा वापर व्हायचा, ज्यामुळे केसांची गळती, मज्जातंतूंचे नुकसान आणि मृत्यू ओढवत असे. -
रेडिअमयुक्त मेकअप
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी रेडिअम असलेल्या क्रीमचा वापर केला जाई, ज्यामुळे वापरकर्त्यांना जीवघेण्या किरणोत्सर्गाचा (Radiation) सामना करावा लागे. -
टाईट-लेसिंग कोर्सेट्स
कंबर अतिशय बारीक दिसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या घट्ट कपड्यांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊन शरीरातील अंतर्गत अवयवांचे नुकसान होत असे. -
विषारी सौंदर्यप्रसाधने
जुन्या काळात फॅशनच्या नावाखाली विषारी रसायनांचा वापर सर्रास केला जाई, ज्याने सौंदर्यापेक्षा आरोग्याचेच जास्त नुकसान झाले.
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत