-
पश्चिम आशियातील अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे.
-
विशेष म्हणजे, या मोहिमेची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासून केली असून, त्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्म्याने कमी करण्याचे निर्देश ‘एसपीजी’ला (SPG) दिले आहेत.
-
पंतप्रधानांच्या या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनीही इंधन बचतीसाठी तयारी केली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार यांनी आज थेट बुलेटवरून विधानभवनात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारपासूनच इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे.
-
सुरक्षेसाठी आवश्यक वाहने वगळता, ताफ्यातील इतर इंधनचलित गाड्यांमध्ये कपात करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेहमीप्रमाणेच या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
-
आज नितीन गडकरी यांनी आपला ताफा बाजूला ठेवून सुरक्षा कर्मचारी, अधिकारी आणि पत्रकारांसह बसने प्रवास केला.
-
मंत्री उदय सामंत यांनीही आता इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला आहे. “पर्यावरणाचे रक्षण आणि ऊर्जा बचत ही काळाची गरज असून ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
-
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आमदार नितेश राणे यांनी चक्क चालत मंत्रालय गाठले.
-
एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून इंधन बचतीचे आणि काटकसरीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावरून सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.
-
इंधन दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”