-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत.
-
सुप्रिया सुळे यांनी नुकतीच आपल्या कुटुंबासोबतची एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
सध्या त्या पती सदानंद सुळे आणि मुलगा विजय सुळे यांच्यासोबत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या दौऱ्यावर आहेत.
-
सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे याने न्यूयॉर्क विद्यापीठातून (NYU) आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
-
विजयने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’ या विषयात आपली एमबीए (MBA) पदवी यशस्वीपणे संपादन केली आहे.
-
मुलाच्या पदवीदान समारंभाचे औचित्य साधून सुळे कुटुंबीयांनी न्यूयॉर्कमध्ये एकत्र आनंद साजरा केला.
-
“आजचा दिवस अभिमान, कृतज्ञता आणि आनंदाने भरलेला आहे,” अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
-
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेला हा कौटुंबिक फोटो आणि माहिती सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत