-
जगातील १०० अत्यंत लोकप्रिय आणि मानाच्या ??? आईस्क्रीमच्या आईस्क्रीम कंपन्यांच्या जागतिक यादीत भारतातील पाच आगळ्यावेगळ्या स्थानिक स्वादांनी मानाचे स्थान मिळवले आहे.
-
या जागतिक स्पर्धेत इंग्लंडचे ‘क्लॉटेड क्रीम’, इटलीचे ‘पिस्ता जिलाटो’ व तुर्कीचे ‘दोंदुर्मा’ हे आईस्क्रीम्स अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांवर राहिले आहेत.
-
मँगो आईस्क्रीम सँडविच, के. रुस्तम अँड कंपनी, मुंबई
मुंबईतील या प्रसिद्ध कंपनीचे १९५३ पासूनचे कडक वेफर्सच्या मधोमध दाबलेले आंब्याचे आईस्क्रीम जुन्या आठवणींना उजाळा देत जगभरात प्रसिद्ध झाले आहे. -
गडबड आईस्क्रीम, पब्बाज्, मंगळूरू
मंगळूरू येथील उपाहारगृहाने वर्ष १९७५ मध्ये सुरू केलेले हे ‘गडबड आईस्क्रीम’ म्हणजेच विविध फळे, सुकामेवा व जेली यांचे काचेच्या पेल्यातील एक मधुर मिश्रण आहे. -
टेंडर कोकोनट, नॅचरल्स आईस्क्रीम
मुंबईत वर्ष १९८४ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने शहाळ्याच्या खोबऱ्यापासून बनवलेल्या आईस्क्रीमने आपल्या नैसर्गिक चवीमुळे ग्राहकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. -
पेरू आईस्क्रीम, अप्सरा आईस्क्रीम
वर्ष १९७१ मधील या कंपनीचे पेरूच्या चवीचे आईस्क्रीम त्यावर भुरभुरलेल्या तिखट-मिठाच्या भारतीय मसाल्यामुळे आजच्या तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनले आहे. -
डेथ बाय चॉकलेट, कॉर्नर हाऊस, बेंगळूरू
बेंगळुरूमधील कंपनीने १९८२ मध्ये चॉकलेटचे विविध थर, केक आणि मलई वापरून वापरून हे लोकप्रिय आईस्क्रीम तयार केले आहे. -
या जागतिक यशावरून हेच सिद्ध होते की, भारताची गोड खाद्यसंस्कृती केवळ भपकेबाजपणावर नाही, तर प्रांतीय अस्सलता आणि घरगुती आपलेपणावर आधारलेली आहे.
‘झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं’, गाण्यावर तरूणींनी धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अंगभर पेहराव करून…”