-
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पाच देशांच्या दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांचे इटलीत आगमन झाले.
-
इटलीत दाखल होताच पंतप्रधान मोदींचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले.
-
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (PM Giorgia Meloni) यांच्यात अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींचे स्वागत करत, आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आहे.
-
या फोटोला त्यांनी ‘वेलकम टू रोम, माय फ्रेंड’ (माझ्या मित्रा, रोममध्ये तुझे स्वागत आहे) असे कॅप्शन दिले आहे.
-
जॉर्जिया मेलोनी यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जॉर्जिया मेलोनी यांच्याबरोबरच्या भेटीचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “रोममध्ये दाखल झाल्यानंतर मला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत रात्रीच्या भोजनाचा आनंद घेता आला. त्यानंतर आम्ही ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ‘कोलोसियम’ला भेट दिली.”
-
“यावेळी आमच्यात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आज होणाऱ्या मुख्य द्विपक्षीय चर्चेसाठी मी अत्यंत उत्सुक असून, यातून भारत आणि इटलीमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील, यात शंका नाही.”
-
पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या या फोटोंना आणि दोन्ही जागतिक नेत्यांमधील या बॉन्डिंगला नेटीझन्सकडून मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी/सोशल मीडिया)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला! सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत