-
“काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात”, असे खळबळजनक वक्तव्य सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान केले होते.
-
सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र पडसाद उमटले आणि याच वादातून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या डिजिटल व व्यंगात्मक राजकीय चळवळीचा जन्म झाला.
-
विशेष म्हणजे, ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तब्बल २० लाखांहून अधिक लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे.
-
सध्या सोशल मीडियावर हा देशातील सर्वात मोठा व्हायरल ट्रेंड ठरत आहे.
-
ही अनोखी डिजिटल चळवळ अभिजीत दीपके (३०) या मराठी तरुणाने सुरू केली आहे.
-
अभिजीत यांनी यापूर्वी ‘आम आदमी पक्षा’चे (AAP) सोशल मीडिया हँडल सांभाळले आहे.
-
“या चळवळीला देशातून इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी आम्ही अपेक्षाही केली नव्हती,” अशी प्रतिक्रिया अभिजीत यांनी ‘लाईव्ह मिंट’शी बोलताना दिली.
-
दरम्यान, या चळवळीची व्याप्ती सोशल मीडियावर वेगाने वाढत असून, काही प्रमुख राजकीय नेत्यांनीही या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कॉक्रोच जनता पार्टी/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी