-
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचा २४ मे रोजी लग्नाचा वाढदिवस होता.
-
लग्नाच्या या खास दिवशी त्यांची मोठी मुलगी सारा तेंडुलकर हिने आई-वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
साराने सोशल मीडियावर तिच्या आई-वडिलांचा एक जुना आणि सुंदर फोटो शेअर केला आहे.
-
हा फोटो शेअर करत साराने ‘हॅपी ॲनिव्हर्सरी’ (लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा) असे लिहिले आहे.
-
कॅप्शनमध्ये तिने ‘हाऊ डीड आय गेट सो लकी?!’ (मी इतकी नशीबवान कशी काय?!) असे पण लिहिले आहे.
-
या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये सचिन आणि अंजली खूप आनंदी दिसत आहेत.
-
साराची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रचंड लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत