-
भारताची ओळख केवळ संस्कृतीपुरती मर्यादित नसून, शतकांचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक वारशामुळेही आहे. देशातील ‘युनेस्को’ जागतिक वारसा स्थळे, भारताची कला, वास्तुकला आणि निसर्गाचे जिवंत उदाहरण आहेत. पर्यटनाची आवड असणाऱ्यांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे अशा १० ठिकाणांची ही विशेष माहिती: (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश
मुघल साम्राज्याची भव्यता दर्शवणारा हा विशाल लाल दगडांचा किल्ला इतिहासप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
अजिंठा आणि वेरूळ लेण्या, महाराष्ट्र
डोंगर कोरून बनवलेल्या या प्राचीन लेण्या आणि वेरूळचे अद्वितीय ‘कैलास मंदिर’ ऐतिहासिक शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
आमेर किल्ला, राजस्थान
जयपूरमधील डोंगरावर वसलेला हा राजेशाही किल्ला येथील विलोभनीय ‘शीश महल’ आणि उत्कृष्ट वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
चोल मंदिरे, तमिळनाडू
चोल राजांच्या काळातील ही प्राचीन मंदिरे आणि तेथील भव्य नंदी मूर्ती आजही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जातात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
हम्पी, कर्नाटक
विजयनगर साम्राज्याची ही प्राचीन राजधानी. येथील दगडी रथ, मंदिरे आणि विखुरलेल्या ऐतिहासिक अवशेषांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
खजुराहो मंदिरे, मध्य प्रदेश
दगडांवरील अतिशय बारीक नक्षीकाम आणि उत्कृष्ट मूर्तिकलेसाठी खजुराहोची मंदिरे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
कुतुबमिनार, दिल्ली
विटांनी बांधलेला हा भारतातील सर्वात उंच मनोरा असून, येथील गंज न लागणारा ऐतिहासिक लोहस्तंभ थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
हा जगातील सर्वात मोठा खारफुटीचा जंगल प्रदेश असून, ‘रॉयल बंगाल टायगर’ वाघांचे हे हक्काचे निवासस्थान आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
ताजमहाल, उत्तर प्रदेश
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला हा पांढऱ्या संगमरवरी वास्तूचा महाल प्रेमाचे आणि अप्रतिम सौंदर्याचे प्रतीक आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
पश्चिम घाट (सह्याद्री)
विविध वनस्पती, धबधबे आणि घनदाट जंगलांनी समृद्ध असलेला हा परिसर निसर्गप्रेमींसाठी पृथ्वीवरील स्वर्गच आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत