-
कोल्हापूरचे भारतीय जनता पार्टीचे (भाजप) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे थोरले चिरंजीव पृथ्वीराज महाडिक (Pruthviraj Mahadik) यांनी नुकतेच आपल्या कुटुंबासह एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
पृथ्वीराज महाडिक यांनी २०२१ मध्ये वैष्णवी महाडिक (Vaishnvi Mahadik) यांच्यासह पुण्यात मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
वैष्णवी महाडिक या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि त्यांच्या पोस्टची नेहमीच चर्चा होत असते.
-
पृथ्वीराज आणि वैष्णवी यांना ‘अमरेंद्र’ (Amarendra Mahadik) नावाचा एक गोड मुलगा आहे.
-
या विशेष फोटोशूटसाठी पृथ्वीराज, वैष्णवी आणि अमरेंद्र यांनी मॅचिंग कपडे परिधान केले आहेत.
-
व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये हे तिघेही पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट अशा क्लासिक लूकमध्ये दिसत आहेत.
-
वैष्णवी महाडिक यांचा मनमिळाऊ आणि सुस्वभावी स्वभाव नेहमीच सर्वांची मने जिंकून घेतो.
-
दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज अशी तीन मुले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
एक टूथब्रश किती महिने वापरणे योग्य? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला