-
उन्हाळा सुरू होताच भारतीय आंब्यांची गोडी जगभर पोहोचते, मात्र यंदा भारतीय आंबा निर्यातदारांना जपानकडून मोठा धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
कीटक नियंत्रण प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचे कारण देत जपानने ऐन हंगामात भारतातून ताज्या आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
दरवर्षी आंबा हंगामापूर्वी जपानी अधिकारी भारतात येऊन ‘व्हेपर हीट ट्रीटमेंट’ (बाष्प उष्णता प्रक्रिया) केंद्रांची कडक तपासणी करतात. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
मार्च २०२६ मध्ये उत्तर प्रदेशातील एका प्रक्रिया केंद्राच्या तपासणीत त्रुटी आढळल्याने जपानने २५ मार्चनंतरच्या भारतीय प्रमाणपत्रांना अमान्य केले आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
जपानला प्रामुख्याने ‘फ्रूट फ्लाय’ (फळ माशी) या घातक कीटकाची भीती असून, आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हा कडक निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
या बंदीमुळे महाराष्ट्राचा जगप्रसिद्ध हापूस, गुजरातचा केसर, लंगडा, चौसा आणि बंगनपल्ली यांसारख्या दर्जेदार आंब्यांच्या निर्यातीला खिळ बसली आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
यापूर्वी १९८६ मध्येही जपानने अशीच बंदी घातली होती, जी तब्बल २० वर्षांनी म्हणजेच २००६ मध्ये वैज्ञानिक पुराव्यांनंतर उठवण्यात आली होती. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
जपान हा भारतीय आंब्यांसाठी खूप मोठा बाजार नसला, तरी तिथे मिळणाऱ्या प्रीमियम (उच्च) दरांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत असे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
यंदा आधीच हवामान बदल, कडक उन्हाळा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने आंबा उत्पादक संकटात आहेत. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
-
सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असली, तरी प्रक्रिया केंद्रांचे मानांकन सुधारेपर्यंत यंदाच्या हंगामात ही बंदी उठणे कठीण दिसत आहे. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स)
‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावर काकू झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “काकू तुम्ही हिरोईनपेक्षा भारी”