-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे यांच्या घरी सध्या लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
सुप्रिया सुळे यांची सुपुत्री रेवती सुळे ही नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्याशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असून, दोन्ही कुटुंबांमध्ये या नव्या नात्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
दोन्ही कुटुंबे अत्यंत आनंदाने एकमेकांना लग्नाची लग्नपत्रिका आणि आहेर देताना दिसत आहेत.
-
सुप्रिया सुळे या आपल्या होणाऱ्या व्याही आणि विहिणीचे पारंपरिक पद्धतीने ओवाळून व टिळा लावून स्वागत करताना पाहायला मिळत आहेत.
-
रेवती सुळे, सारंग लखानी आणि सुळे व लखानी कुटुंबातील सर्व सदस्य एका कौटुंबिक चौकटीत एकत्र बसून आनंदी पोझ देत आहेत.
-
विवाहाच्या तयारीची सुरुवात म्हणून सुंदर फुलांची सजावट, मिठाई आणि आकर्षक भेटवस्तूंचे बॉक्स टेबलवर सजवलेले दिसत आहेत.
-
या सर्व सुंदर अन् कौटुंबिक फोटोंचा अल्बम शेअर करत सुप्रिया सुळे यांनी ‘Gratitude’ (कृतज्ञता) अशी कॅप्शन लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
३ वर्षातून एकदा येते ‘ही’ संकष्टी चतुर्थी, अधिक महिन्यामुळे ठरते खास; पाहा तारीख, चंद्रोदय आणि उपवसाची योग्य वेळ