-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते ई-रिक्षा उपक्रमाचा शानदार शुभारंभ करण्यात आला आहे.
-
या विशेष उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अमृता फडणवीस आणि बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
-
या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी स्वतः ई-रिक्षा चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
सामाजिक कार्यकर्त्या साहेर भामला यांनी सोशल मीडियावर या खास क्षणांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये अमृता फडणवीस, भूमी पेडणेकर आणि साहेर भामला रिक्षात एकत्र दिसत आहेत.
-
अमृता फडणवीस यांनी रिक्षाचे हँडल हातात घेणे हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचे साहेर भामला यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
-
हे फोटो शेअर करताना साहेर भामला यांनी ‘महिला बदलाच्या अग्रभागी’ (Women at the front seat of change) असा सुंदर संदेश दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: साहेर भामला/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…