-
खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज आणि सून मंजिरी (अंजली) महाडिक यांना ६ मे, बुधवार रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.
-
या गोड चिमुरडीच्या आगमनाने महाडिक कुटुंबामध्ये सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
आता या चिमुकल्या परीच्या जन्माला १ महिना पूर्ण झाला असून त्यानिमित्ताने खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
-
विश्वराज महाडिक यांची पत्नी अंजली महाडिक हिने सोशल मीडियावर आपल्या बाळाचे अत्यंत गोंडस फोटो शेअर केले आहेत.
-
अंजलीने हे सुंदर फोटो शेअर करताना सोशल मीडियावर ‘One Month’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोंमध्ये चिमुकलीचे गोड पाय, इवलेसे हात आणि एक सुंदर क्रोसाँ (Croissant) दिसत आहे, ज्यावर ‘१’ क्रमांकाची मेणबत्ती लावलेली आहे.
-
दुसऱ्या एका फोटोमध्ये अंजली महाडिक आपल्या लाडक्या लेकीला कडेवर घेऊन तिच्याकडे अत्यंत प्रेमाने आणि हसतमुख चेहऱ्याने पाहताना दिसत आहे.
-
सोशल मीडियावर महाडिक परिवाराच्या या गोड परीचे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अंजली महाडिक /इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…