-
Lalbaugcha Raja 2026 Shree Ganesh Muhurta Pujan: मुंबईकरांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या आगामी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
-
प्रतिवर्षाप्रमाणे आज, मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने राजाचे “श्री गणेश मुहूर्त पूजन” अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.
-
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते पहाटे ठीक ५ वाजता हा विधी पार पडला.
-
या मंगलप्रसंगी मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांच्या शुभहस्ते गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही विधिवत पूजन करण्यात आले.
-
या पूजनाने लालबागच्या राजाच्या २०२६ मधील महोत्सवाचा श्रीगणेशा झाला आहे.
-
यंदा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव सोहळा सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ (गणेशचतुर्थी) ते शुक्रवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) या कालावधीत साजरा होणार आहे.
-
गणेशोत्सवाच्या मुख्य दिवसांआधी होणारा लालबागच्या राजाचा ‘प्रथम दर्शन सोहळा’ देखील भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
-
तासनतास रांगेत उभे राहून मुख दर्शन घेणे असो वा चरण स्पर्श, लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक मुंबईत गर्दी करतात.
-
या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवाची तयारी आता अधिकृतपणे सुरू झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : लालबागचा राजा/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ