-
विद्याविहार येथील गृहनिर्माण सोसायटीत जैन मुनींच्या स्वागतासाठी रहिवाशांच्या परवानगीशिवाय पांढरे पट्टे आखल्याने वाद निर्माण झाला.
-
सोसायटीच्या आवारात पांढऱ्या तैलरंगाचे (ऑईल पेंट) पट्टे आखल्याचा आरोप प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी केला आहे.
-
प्रसाद वेदपाठक हे त्याच सोसायटीत राहत असून, या जमिनीची मूळ मालकी त्यांच्याच कुटुंबाची असल्याने त्यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
-
उन्हात जमीन तापू नये आणि अनवाणी चालणाऱ्या साधू-संतांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून हे पट्टे आखल्याचे जैन अनुयायांकडून सांगण्यात आले.
-
तसेच चालताना पायाखाली जीवजंतू मरू नयेत आणि पावसाळ्यातील शेवाळ पायाखाली चिरडले जाऊ नये, या जीवदयेच्या हेतूने हे पट्टे मारल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
-
या वाद आणि आक्षेपांवर पडदा टाकण्यासाठी आता सोसायटीच्या आवारातील त्या पांढऱ्या पट्ट्यांवर दुसरा रंग देण्यात आला आहे.
-
हा वाद शांत झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक यांनी एका जैन मंदिरातील आपला फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला.
-
प्रसाद वेदपाठक यांनी पोस्टमध्ये लिहिले की, जैन धर्म हा मानवजातीला माहीत असलेल्या सर्वांत सुंदर तत्त्वज्ञानांपैकी एक आहे. त्याच्या केंद्रस्थानी केवळ मानवांबद्दलच नाही, तर प्रत्येक सजीव प्राण्याबद्दल कमालीची करुणा आणि दयाभाव आहे. खरा पराक्रम इतरांवर विजय मिळवण्यात नसून, स्वतःचा अहंकार, राग, लोभ आणि द्वेषावर विजय मिळवण्यात आहे, अशी शिकवण हा धर्म देतो. कृपया कोणालाही तुमची दिशाभूल करू देऊ नका कोणताही धर्म वाईट नसतो; पण हो, काही संस्था, ट्रस्ट किंवा संघटना तुमच्याकडून अशा गोष्टी करवून घेऊ शकतात, ज्या त्रासदायक किंवा क्लेशदायक ठरू शकतात. सर्व खऱ्या जैन अनुयायांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद!
-
(सर्व फोटो सौजन्य: प्रसाद वेदपाठक/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत